एका मनमोहक सकाळी, फावल्या क्षणी एक विचार माझ्या मनात आला, सर्वोत्तम गुंतवणूक कोणती ? आणि वीज चमकावी तसा एक विचार मनात आला - सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक हि तुमच्या सर्वांगिक विकासासाठी - आर्थिक , सामाजिक , शारीरिक , अध्यात्मिक विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. हि गुंतवणूक तुम्हाला अगदी शेवट पर्यंत तुमच्या ध्येयप्राप्तीसाठी दृश्यप्रकारे किंवा अदृश्यप्रकारे मदत करत असते. आणि जर आपण आपल्या सेल्फ डेव्हलपमेंट मध्ये गुंतवणूक नाही करणार तर कोण करेल?
"Self-development is invaluable to not only ensure your own success but it also enables us to develop others." John Maxwel
आणि जर तुमचा प्रश्न आर्थिक गुंतवणूक बद्दल असेल तर -
स्थावर मालमत्तेत केलेली गुंतवणूक हि जास्त फायदेशीर ठरते. तसेच शेयर मार्केट मध्ये काही निवडक शेयर्स मध्ये किंवा काही निवडक म्युच्युअल फंडस् मधील गुंतवणूक सुद्धा आकर्षक परतावा देऊ शकतात.
पण स्थावर मालमत्ता किंवा शेयर मार्केट यापैकी एकाची निवड करून किंवा शक्य असल्यास दोघांमध्ये काही प्रमाणात गुंतवणूक करून सुद्धा चांगले परतावे मिळू शकतात.
या दोघे पर्यायांचा विचार करताना काही बाबी विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहे .
जसे कि -
१) गुंतवणूक करता येण्याजोगी रक्कम किती
२) गुंतवणूक करण्यामागची आपली मंशा काय आहे
३) किती काळापर्यंत गुंतवणूक करायची आहे
४) जवळच्या काळात आपली काही आर्थिक कंमेंटमेंट्स आहे का
५) गुंतवणुकीचा काळ संपल्या नंतर मिळणाऱ्या पैशातून आपल्याला काय ध्येय सध्या करायचे आहे
६) आपली किती नुकसान सहन करायची ताकत आहे
शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याआधी एक खूप महत्वाचे तत्व लक्षात घ्यायला हवे - एखाद्या शेयर वर प्रेम करा पण त्याच्याशी लग्न करू नका . अर्थात - तुमची ठरलेली लिमिट आली ( नफा किंवा तोटा) की त्यातून बाहेर पडा , त्याच्यात गुंतून राहू नका.
पण वरील तत्व हे शॉर्ट टर्म ( एक-दोन वर्ष पर्यंत ) कामात येते, ते लॉंग टर्म गुंतवणूक साठी कामाचे नाही. तुम्ही अभ्यास करून एखाद्या शेयर मध्ये २०-२५ वर्ष पर्यंत पण गुंतवणूक करणे हे उपयुक्त आहे. त्या मध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ( चक्रवाढीचा फायदा ) ची जादू अनुभवायला मिळते.
कोणत्याही गोष्टीचा फायदा होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धीर . शेयर मार्केट मध्ये यशस्वी होण्यासाठी धीर ठेवणे या पेक्षा जास्त चांगला, सोपा आणि खात्रीचा मार्ग दुसरा नाही .
शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे आधी तुम्हाला तुमचे आर्थिक उद्दिष्ट्य आणि ते आर्थिक उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ यांची सांगड घालणे अतिशय महत्वाचे आहे .
चला तर मग बघूया कि शेयर बाजारात गुंतवणूक करतांना खालील मुद्दे लक्षात घ्यावे , जसे :-
१) तुमच्या मासिक उत्पन्न आणि जीवनावश्यक घरघुती खर्च यांची सांगड घालणे .
२) उरलेल्या पैशातून अगोदर गुंतवणुकीस पैसे वेगळे काढणे आणि गुंतवणूक करणे . आणि पैसे उरल्यास इतर खर्च करणे . अनावश्यक खर्च कपात करणे.
३) आर्थिक उद्दिष्ट्य ठरवणे आणि त्या साठी किती वेळ द्यायची तुमची तयारी आहे हे ठरवणे .
४) गुंतवणूक ची साधने आणि त्याच्या संदर्भातील मूलभूत बाबींची तोंड ओळख करून देणे .
५) गुंतवणूक च्या प्रत्येक साधनांचे फायदे आणि तोटे समजून घेणे
६) आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या आर्थिक घडामोडींचा मागोवा घेणे
७) त्या आर्थिक घडामोडींचा आपल्या गुंतवणुकीवर होणार परिणाम समजून घेणे
८) आपण केलेल्या गुंतवणुकीवर आणि भविष्यातील करणाऱ्या गुंतवणुकीवर ठाम राहणे आणि त्यात नियमित असणे. शिस्तबद्ध गुंतवणूक .
९) मुदतीच्या आधी ही गुंतवणूक काढण्याची वेळ पडल्यास , जास्तीत जास्त गुंतवणूक कशी वाचवता येईल हे बघणे
Comments